🕒 1 min read
औरंगाबाद : खासदार संभाजी राजे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. त्याअनुषंगाने ते दि. ३ रोजी पैठणगेट जवळील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समन्वयक रमेश केरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले, त्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली फेर विचार याचिका देखील फेटाळण्यात आली. त्या अनुषंगाने खासदार संभाजी राजे महाराष्ट्र भर दौरे करीत आहे. त्याचाच भाग म्हणून संभाजी राजे गुरुवारी आणि शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करीत आहे.
त्याच दरम्यान, दि. ३ रोजी दुपारी तीन वाजता ते संवाद साधणार आहे. यावेळी क्रांती चौक येथील प्रलंबित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम, वेरूळ येथील छत्रपती शहाजी राजे भोसले गढीचा विकास या संदर्भात त्यांना प्रश्न मांडण्यात येणार असून त्या प्रश्नांचा सरकार दरबारी पाठ पुरावा करण्यात येणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न


