Share

मराठा आरक्षणावरून खा.संभाजीराजे पुन्हा आक्रमक; लॉंगमार्चच्या तयारीला लागण्याचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

रायगड : अजून वेळ गेलेली नाही. शासनाने आरक्षणाची जबाबदारी पार पाडावी. नाही तर लाँग मार्चचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा खा. संभाजीराजे भोसले यांनी केंद्र व राज्य शासनाला दिला. रायगड जिल्ह्यातून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाल्यानंतर खा. संभाजीराजे प्रथम खालापुरातील वावोशी येथे आले होते. त्यावेळी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. अशातच आता खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. अशातच संभाजीराजे या मुद्द्यावरुन लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

‘मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दोन्ही सरकार एकमेंकावर जबाबदारी झटकत आहे. अन्य मागण्यांकडेही गंभीरपणे पाहिले जात नाही. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुणे-मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी सुरू करा’, असे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाच्या तसेच इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. या सरकारला जागं करण्यासाठी मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी ठेवावी, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याची सुरूवात ही रायगडमधून होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

संभाजी राजेंच्या राज्यव्यापी दौरा २५ ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नसल्याचं सांगत सरकारला आम्ही अल्टिमेटमही दिलं होतं. मात्र, सरकारनं दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता चर्चेला जागा नाही, असे सांगत त्यांनी पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. कोरोना संकटात त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचं आवाहन केले होते. पण आता सरकार केवळ ते कारण पुढे करत असल्याचं सांगत सरकारच्या उदासीन भूमिकेवर हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!