हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर गुरुवारी या ठिकाणाहून मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने पुण्यामध्ये उपचार सुरु केले आहेत.
दरम्यान, खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर त्यांना पुणे येथील जहांगीर हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील लिलावती हाॅस्पिटल मधील तज्ज्ञ टीम उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकृतीवर लिलावतीचे डॉक्टर लक्ष ठेवून
खासदार राजीव सातव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे वृत्त काही माध्यमांवर देण्यात आले होते. तसेच त्यांना मुंबईत हलवले जाणार असेही सांगण्यात येत होते. परंतु, त्यांना मुंबईत हलवले जाणार नाही. सोबतच, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीं यांनी सांगितले. तसेच सातव यांच्या प्रकृतीवर लिलावती हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.
पुण्यात घेत आहेत उपचार
दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनीही दूरध्वनीवरून विचारणा केली आहे. याच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहिलोत, यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम पुण्यात सातव यांच्या प्रकृतीकडे लक्ष टवून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

