टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे होणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हा मेळावा उसतोड कामगार आणि राज्यातील तमाम ओबीसी समाजाचा असल्याचे पंकजा मुंडे वारंवार सांगत असल्या तरी याला राजकारणाची एक किनार असते. यंदा तर राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत होत असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याच बोलल जात आहे.
तत्पूर्वी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची समाधी स्थळ असणाऱ्या गोपीनाथ गड येथून एक रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन केले आहे. या रॅलीमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
आजची हि रॅली निवडणुकीची रॅली नाही, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भगवान बाबांवर श्रद्धा असणारे भाविक रोज जगण्यात येणाऱ्या संघर्षासाठी उर्जा घेऊन जाण्यासाठी या मेळाव्याला हजेरी लावत असतात. आणि अमित शहा हे पक्षाच्या प्रचारासाठी नाही तर भगवान बाबांच्या दर्शनासाठी सावरगाव येथे येत असल्याने परळीतील विरोधकांनी याची धास्ती घेऊ नये. असा टोला यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181446252577226752?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443943717720065?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443530561994753?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181430112878780416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

