Share

अटकेतील पुत्राला भेटण्यासाठी नारायण राणे दिल्लीहून थेट सिंधुदुर्गात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  नितेश राणेंच्या अटकेनंतर राज्यसभेचे खासदार नारायण राणे पुत्रप्रेमापोटी दिल्लीहून सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. उपअभियंत्याच्या अंगावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. दरम्यान या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते.
दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, येत्या ९ जुलै पर्यंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

संसादेत अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होते. अर्थसंकल्प  अधिवेशन संपताच नारायण राणे पुत्र नितेश राणे यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. नारायण राणे यांनी दोडामार्ग तहसिलदार कचेरीतील पोलीस कोठडीत नितेश राणे यांची भेट घेतली. तसेच मातोश्री निलिमा राणे आणि भाऊ निलेश राणे यांनीही नितेश राणे यांची पोलीस कोठडीत जात भेट घेतली.
विशेष म्हणजे नितेश राणे यांनी केलेया या कृत्यावर नारायण राणेही नाराज आहेत. नितेशने केलेले आंदोलन योग्य परंतु कार्य चुकीचे असे नारायण राणे यांनी म्हंटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!