Share

क्रीडा विद्यापीठासाठी खासदार इम्तियाज जलील आक्रमक, जन आंदोलन उभारण्याचे आवाहन

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यात होणारे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे इथं हलवण्यात आले आहे. या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री या बाबत कठोर भूमीका घेत नसल्याचा आरोपही खासदार इम्तियाज यांनी केला आहे. आता या संदर्भात २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही या आंदोलनात सहभागी होण्याचे खुले आवाहन खासदारांनी केले आहे. इतकच नाही सर्व राजकीय पक्षांनी आपल्या शहरासाठी शहराचे नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन खासदारांनी केले आहे.

औरंगाबादमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्यासंदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. वास्तविक या विद्यापीठासाठी औरंगाबाद जवळील जागाही निश्चित करण्यात आली होती. असे असताना पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळेच हा निर्णय झाला असल्याचा आरोपही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आता या विद्यापीठाच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते कोणती भूमीका घेतात, ते तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!