Share

‘संभाजीनगर’ला कोणी विरोध करत असेल तर करू द्या, हरकत नाही’, शिवसेनेचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला

Published On: 

औरंगाबाद– औरंगाबाद नामांतर हा मुद्दा सध्या राज्य आणि स्थानिक पातळीवर चांगलाच गाजतोय. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा आस्थेचा केलाय, तर शिवसेनेने संभाजीनगर ही अस्मिता असल्याचे म्हटले आहे. त्याउलट कॉंग्रेसने शहराचे नाव बदलून विकास होणार का असा प्रश्न करत सातत्याने मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करत नामांतराला विरोध केला. संभाजीनगर की औरंगाबाद यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत बिघाडी सुरू असल्याचे दिसतेय. कारण, शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आता थेट अप्रत्यक्षरित्या कॉंग्रेसला टोला लगावला आहे. संभाजीनगर नावाला कोणी विरोध करत असेल तर करू द्या, हरकत नाही असे वक्तव्य आमदार दानवे यांनी केले.

औरंगाबाद शहरातील कलाकट्टा या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद नामांतराबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 1988 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर हे नाव दिले. या शहराचे नाव पूर्वी फत्तेबाद होते. फत्ते म्हणजे विजय. पूर्वी अनेक लढाया होत. त्यात जय-विजय होत असत. मात्र, औरंगजेबाने ज्या पद्धतीने संभाजी राजांना मारले, हालाहाल केले. ते संतापजनक आणि खूप दुखःदायक होते. आमच्या राजांना मारणाऱ्या अशा व्यक्तीचे नाव कोणत्याच शहराला नको अशी बाळासाहेबांची भूमिका होती.

संभाजीनगर नामकरण व्हावे याकरिता 2 वेळेस महापालिकेने ठराव घेतला होता. 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात संभाजीनगर नाव ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते रद्द झाले. त्यावर पुन्हा एकदा मनपाने ठराव पाठवला. आता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे.

गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना संभाजीनगरसाठी आग्रही असल्याचे दानवे म्हणाले. मुस्लीम देखील आपल्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मग शहराचे नाव औरंगाबाद का असावे असा सवाल अंबादास दानवे यांनी यावेळी विचारला आहे. त्याचवेळी कोणी विरोध करत असेल तर करू द्या, हरकत नाही असा टोलाही अप्रत्त्यक्षपणे काँग्रेसला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!