🕒 1 min read
भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.
या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ‘आज मी येथे उपस्थित नसलो तरी, आपण सर्व एकत्र आहोत. भंडाऱ्यामध्ये जे घडले ते योग्य नाही. काल रात्री त्या घटनेबद्दल मला समजले.’ असं म्हणत त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, काल उद्धव ठाकरे हे काल याच भागात दौऱ्यावर होते असा उल्लेख देखील त्यांनी केला आहे.
‘भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.’असं ट्विट देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
महत्वाच्या बातम्या
- #भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- #भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

