🕒 1 min read
औरंगाबाद – गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना ‘संभाजीनगर’ नावासाठी आग्रही आहे. मुस्लिम समाज बांधव देखील आपल्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मग शहराचे नाव औरंगाबाद का असावे असा सवाल आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद शहरातील कलाकट्टा या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आ.अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद नामांतराबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 1988 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर हे नाव दिले. या शहराचे नाव पूर्वी फत्तेबाद होते. फत्ते म्हणजे विजय. पूर्वी अनेक लढाया होत. त्यात जय-विजय होत असत. मात्र, औरंगजेबाने ज्या पद्धतीने संभाजी राजांना मारले, हालाहाल केले. ते संतापजनक आणि खूप दुखःदायक होते. आमच्या राजांना मारणाऱ्या अशा व्यक्तीचे नाव कोणत्याच शहराला नको अशी बाळासाहेबांची भूमिका होती.
https://www.facebook.com/iambadasdanve/posts/3731223020297895
संभाजीनगर नामकरण व्हावे याकरिता 2 वेळेस महापालिकेने ठराव घेतला होता. 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात संभाजीनगर नाव ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते रद्द झाले. त्यावर पुन्हा एकदा मनपाने ठराव पाठवला. आता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. गेल्या 32 वर्षांपासून शिवसेना संभाजीनगरसाठी आग्रही असल्याचे दानवे म्हणाले. मुस्लिम देखील आपल्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही. मग शहराचे नाव औरंगाबाद का असावे असा सवाल अंबादास दानवे यांनी यावेळी विचारला.
https://www.facebook.com/iambadasdanve/posts/3730000617086802
संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय असून, शहराच्या नामकरणासाठी पाठपुरावा सुरूच राहील. दुसरीकडे शहराचा विकासही गतीने होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना फायदा करून देण्यासाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात मदत केंद्र सुरू करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर ते सुद्धा…; शिवसेनेची मोदींवर टीका
- डोनाल्ड ट्रम्प यांना दिला जबरदस्त दणका; ट्विटरने उचलले मोठे पाऊल
- आधी कायदे वापसी नंतर घर वापसी; शेतकऱ्यांचा मोदी सरकारला टोकाचा इशारा
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भारतीय संघावरती दुखापतीच सावट; पंतसह जडेजा देखील मैदानाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

