Share

दारुबंदीसाठी मातांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: 

नांदेड : मद्दपीच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून धर्माबादच्या नायगाव येथील महिलांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथे मद्यपींचा त्रास वाढला आहे. शाळेतील चौथीच्या वर्गातले विद्यार्थी मद्य प्राशन करतात आणि गावात धिंगाणा घालतात. शाऴकरी मुले 10-10 रुपये जमा करुन दिवसाढवळ्या एकत्र दारु पितात आणि गावात धिंगाणा घालतात. या प्रकाराला कंटाळून गावातील तब्बल 180 महिलांनी एकत्र येऊन तत्काळ दारुबंदी करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

नायगाव हे गाव तेलंगणा राज्याच्या सिमेवर वसलेले आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या प्रत्येकी 1400 च्या आसपास आहे. तेलंगण राज्यातील गावापेक्षा नायगाव येथे दारु स्वस्त मिळते. त्यामुळे नायगाव येथे दिवसभर दारु खरेदीसाठी गर्दी असते. त्यात गावातील पुरुष मंडळीही दारुच्या आहारी जाऊन महिलांना मारहाण करतात अशी तक्रार महिलांनी केली आहे.

कोरोना प्रभावामुळे येथे शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग आणि अभ्यास असा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. आई-वडिल दिवसभर शेतात काम करतात. त्यामुळे दुर्लक्षित झालेली शाळकरी मुलेही दारुच्या आहारी गेली. तेव्हा तत्काळ दारुबंदी करुन या त्रासापासुन मुक्ती द्यावी अशी मागणी या महिलांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन गावातील महिलांच्या स्वक्षऱ्या घ्या तत्काळ दारुबंदी करु असे आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!