औरंगाबाद : तब्बल दोन आठवडे गायब असलेला पाऊस अखेर परतला. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजाने आभाळमाया केली असून विभागात सर्वाधिक ३०मिमी पाऊस जिल्ह्यात झाला. त्याखालोखाल जालना १३.९, उस्मानाबाद ११.३, बीड ८.३, हिंगोली ६.६, लातूर ५, नांदेड १.९ तर परभणी जिल्ह्यात अवघा ०.५ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सिल्लोड तालुक्यात बरसला. या तालुक्यात ४९.५ मिमी पावसाची नोंद झाली. पैठण ४२, सोयगाव ४१, कन्नड ३४, खुलताबाद व गंगापूर २८, औरंगाबाद २५, वैजापूर १५.४ तर फुलंब्री तालुक्यात ११.४ मिमी पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
मका, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, तूर अशा सर्वच खरीप पिकांना जीवदान देणारा हा पाऊस आहे. आता सलग पाऊस पडणार असल्याने मका, कापूस यासह कडधान्य पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आणि परभणीच्या कृषी विद्यापीठाने तयार केलेले ट्रायकोडर्मा कॉम्बिनेशन हे औषध वापरावे. दोनशे रुपयात एक लिटर इतके स्वस्त औषध आहे. त्यामुळे मित्र किडी जिवंत राहतात तर शत्रु किडी मरतात. त्याचा मोठा फायदा पिकांना होतो. हलकी अंतर्गत मशागत फायदेशीर ठरेल. तणांचे नियंत्रणनही करावे, असा सल्ला जेष्ठ कृषीतज्ञ उदय देवळाणकर यांनी दिला.
देशभर व्यापणार मान्सून
दीर्घ खंडानंतर परतलेला पाऊस आता देशभर धुमशान वाजवणार आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात येत्या १७-१८ तारखेपर्यंत सर्वत्र पाऊस पडणार अशी माहिती हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. यापूर्वीच्या तुटीची कसर हा पाऊस भरून काढणार आहे. विशेषत: मराठवाड्यातील खरीप पिकांसाठी अतिशय उपयुक्त हा पाऊस असेल असे ओंधकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊत सर्वज्ञ नाहीत’ ; फडणवीसांचा खरमरीत टोला
- पंकजाताई म्हणाल्या भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही; तर फडणवीस म्हणाले…
- भीमा कोरेगाव प्रकरण : चौकशी आयोगासमोर शरद पवार साक्ष नोंदवणार
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ७५ कोटी-नवाब मलिक
- अधिकारी महिलेचा विनयभंग करणारा सहायक पशुधन अधिकारी गजाआड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

