Share

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ७५ कोटी-नवाब मलिक

Published On: 

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शैक्षणिक कर्जासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळाच्या माध्यमातून अनेक बचत गटाच्या महिलांनाही कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकाने ७५ कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल देण्यास मान्यत दिली असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या संदर्भात नवाब मलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ७५ कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल देण्यास मान्यता मिळाली आहे. यामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासह अल्पसंख्याकबहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे.’

मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे महामंडळाचे एकूण भागभांडवल ७०० कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती देखील मलिक यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेक्षणिक कर्ज आणि महिला बचत गटांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!