Share

‘संजय राऊत सर्वज्ञ नाहीत’ ; फडणवीसांचा खरमरीत टोला

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तर महाविकास आघाडीने मात्र यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नव्या सहकार खात्याच्या स्थापनेवर भाष्य केले होते. ‘केंद्रात सहकार खाते तयार झाले आहे. ते केवळ महाराष्ट्र्राला त्रास देण्यासाठी तयार केले असेल तर हा आणखी एक सत्तेचा गैरवापर आहे असं त्यांनी म्हटले आहे. जर सहकार मजबूत करण्यासाठी हे नवीन खाते असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करतो. सहकार हा राज्यघटनेनुसार राज्यांचा विषय आहे. मात्र राज्यातील सहकार संपवण्यासाठी केंद्रातील सहकार खाते काम करणार असेल, तर तो लोकशाहीला फार मोठा धोका आहे,’ असं संजय राऊत यांनी सांगितले होते.

या टीकेला आता भाजपकडून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे. ‘संजय राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत, असं तुम्हाला का वाटतं? तेच पंडित आहेत, त्यांनाच सर्व काही समजतं. त्यांनाच संविधान समजतं हा तुमचा गैरसमज आहे.

इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. ते कशाच्या अखत्यारीत दिले होते? केंद्र सरकारने दूध संघापासून ते सूत गिरण्यांपर्यंत मदत केली, असं सांगतानाच राऊत, सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण ते खरं नाहीये,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!