पुणे : दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले आहे. १ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपद महाराष्ट्राच्या पारड्यात पडले आहे. मात्र, सुरुवातीपासून मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या प्रीतम मुंडे यांची संधी मात्र हुकली आहे. यानंतर, मुंडे भगिनी या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्षाला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही. मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
‘पंकजा मुंडे यांची भूमिका योग्यच आहे. तीच भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे. पक्षात गट-तट असं नाही. भाजपात राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी हीच भूमिका पंकजाताईंनी मांडली आहे. तीच भूमिका पक्षाची आणि आमच्या सर्वांची आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?
जे टीम देवेंद्रमध्ये आहेत, तेच टीम नरेंद्रमध्ये आहेत अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न केला असता असं काही पक्षात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत, हे मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही. पक्षासाठी पक्ष प्रथम… नाही नाही, राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, तृतीय मी, असं आमच्याकडे आहे. मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ ; पटोलेंचा टोला
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- ‘इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला, केंद्रातही आणि राज्यातही’ ; फडणवीसांचा टोला
- ‘दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यांच्या समर्थकांनी नेत्यांकडे विचारणा करावी’
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

