औरंंगाबाद : तक्रारदार अधिकारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या सहायक पशुधन अधिकारी प्रकाश उत्तमराव झोड (वय ५५,रा.क्वार्टर नं.२ शेळी व मेंढी विकास महामंडळ) याला छावणी पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार महिला आणि झोड यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर झोड याने तक्रारदार महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. वाद टोकाला जातच झोड याने अधिकारी असलेल्या महिलेचा विनयभंग केला.
त्यानंतर महिला अधिकारीने छावणी पोलीस ठाणे गाठत झोड विरुद्ध तक्रार दिली होती. अटकेत असलेल्या प्रकाश झोड याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

