Share

कठीण काळात जॉनी लिव्हरचा शाहरुखला पाठिंबा; पण…सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Published On: 

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूखचा मुलगा आर्यन खानला अटक केले. आर्यनच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र काल झालेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला न्यायालयाने फेटाळला आहे. त्याची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर आर्यनच्या समर्थनासाठी अनेक कलाकार पुढे आले.

यातच अभिनेता जॉनी लिव्हरचाही समावेश आहे. पण यावेळी जॉनी लिव्हरला आर्यनचं समर्थन करणं महागात पडलं आहे. जॉनी लिव्हरने आणि अभिनेता शाहरूख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबतकाम केलं आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी शाहरुख सोबतचा कुछ कुछ होता है चित्रपटातील एक फोटो शेअर केला. मात्र याच फोटोमुळे ट्रोलर्सने जॉनीला ट्रोल केले आहे. जॉनी यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांच्या कमेन्ट्स येत आहेत.

https://www.instagram.com/p/CUw8KCbI_Bf/?utm_source=ig_web_copy_link

यात एका युझरने लिहिले ‘ड्रग्स पॉवर’ तर दुसऱ्या युझरने ‘तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हाती.’ असं लिहिलं आहे. तर काहींनी बॉलिवूड नेहमीच  गुन्हेगारांना पाठिंबा देतो’ अशीही कमेंट केली. जॉनची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!