Share

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव अर्ज येथे अन्नदानाऐवजी रक्तदानाला प्राधान्य!

Published On: 

फुलंब्री : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. त्यातच रुग्णांना रक्तांचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी बोरगाव अर्ज येथे रामनवमी निमित्त असणाऱ्या गणपती यात्रोत्सवात  सामाजिक भान जपत गुरुवारी (दि.२२) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात परिसरातील नागरिकांनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावकऱ्यांनी अन्नदाना ऐवजी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. देशात कोरोनाचे संकट असल्याने रक्तांचा साठा कमी आहे. त्यामुळे सामजिक कार्य करण्यासाठी गावातील तरुण पिढी पुढे आली.

अखंड परंपरेनुसार गेल्या शतकाहून अधिक वर्षांपासून बोरगाव अर्ज येथील तीर्थक्षेत्र येथे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चालतो. तर रामनवमी व दशमीला येथे भव्य यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्रातील गणपतीच्या २१ शक्तिपीठांपैकी हे देवस्थान २० वे शक्तीपीठ आहे. या ठिकाणी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला गावकऱ्यांच्या वतीने अन्नदान भंडारा करण्यात येतो. तर मोठी यात्रा याठिकाणी भरत असते. मात्र कोरोनाच्या सावटाने ही अखंड परंपरेनुसार चालणारी यात्रा मागील वर्षांपासून खंडित झाली आहे. त्यामुळे सामाजिक भान जपत गावकऱ्यांच्या वतीने मागील वर्षी व यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागात रक्तदान करण्यासाठी डॉ. जयंत जैतमहाल हे नेहमी अग्रेसर असतात. कोरोना संकाटात कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच ते म्हणतात तरूण जागरूक आहेत स्वतःहून पुढे येत रक्तदान करत आहेत. रक्तदानामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीला जीवदान देऊन शकतो हे कळले आहे. या शिबिरात औरंगाबाद ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी सरपंच शिवाजी खरात, राजेंद्र बलांडे , औरंगाबाद ब्लड बँकेचे डॉ. पवार, डॉ. विजय सोनवणे, डॉ. जयंत जैतमहाल, ग्रामसेवक पानगावकर आदी गावकरी व रक्तदात्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!