Share

‘अखेर इतक्या चिता पेटल्यानंतर मोदींनी राहुल गांधींचं अनुकरण केलं’

Published On: 

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील वेळीच्या लाटेपेक्षा यंदा अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी देशात रेकॉर्ड ब्रेक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, औषधे यांचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. दरम्यन, सर्वोच्च न्यायालयाने यावरून केंद्र सरकारला फटकारले आहे.

दरम्यन, पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्याभरापासून निवडणूक सुरु आहेत. २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल मधील निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडणार असून निकाल २ मे रोजी लागणार आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रभाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती.

यामुळे, एकाबाजूला देशात कोरोनाचा कहर सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. देशातील कोरोना स्थिती लक्षात घेता काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पुढील सर्व प्रचारसभा रद्द केल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयाचा कौतुक देखील केले गेले. आता, देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत उच्चस्तरीय बैठका उद्या मोदींनी बोलावल्या आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल मधील दौरा देखील रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या निर्णयानंतर काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टिपण्णी केली आहे. काँग्रेसच्या नेत्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याबद्दल आभार मानले. ‘प.बंगाल मधील सभा रद्द करून नरेंद्र मोदी यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली. इतक्या लोकांच्या चीता पेटल्यानंतर अखेर पंतप्रधानांच्या प्राथमिकता बदलत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या सभा रद्द केल्याच्या निर्णयाचं हे अनुकरणच आहे. देश सगळं पाहतोय आणि लक्षात ही ठेवतोय.’ असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!