औरंगाबाद : दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यातच जपर्यंत औरंगाबाद शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णांत पुरूषांची संख्या अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पुरुषांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यातुलनेत कोरोना संसर्गाच्या काळात कामाशिवाय घराबाहेर न पडणार्या महिलाच सुरक्षित राहत आहेत. मागील तेरा महिन्यांत शहरात ७४ हजार १३३ जणांना कोरोनाची बाधा झाली. यात ४५ हजार ७६७ पुरुष तर २८ हजार ३६६ महिलांचा समावेश आहे.
मागील वर्षी २०२० मध्ये मार्च महिन्यात शहरात कोरोना संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वांरवार केले जात आहे. तसेच घरीच राहा सुरक्षित रहा, असा संदेश दिला जात आहे. मात्र घराबाहेर कामानिमित्त पडणार्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाची अधिक लागण होत आहे.
मागील १३ महिन्यात शहरात एकूण ७४ हजार १३३ जण पॉझिटिव्ह आढळले. यात ४५ हजार ७६७ पुरुषांचा समावेश आहे.शहरातील आजवरच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण १८ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातील ४४ हजार ६४४ जण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह निघाले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून हा आकडा वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार
- जागतिक वसुंधरा दिनी मिशन ‘हरित औरंगाबाद’!
- राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला – मुख्यमंत्री
- कल्याण मटका खेळवणारा गजाआड


