Share

भारताचे माजी क्रिकेटपटु राजेंद्रसिंह जडेजा यांचे कोरोना संसर्गामुळे निधन

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लढ्यात अनेक रुग्णांना अपुऱ्या औषधापोटी आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे जिव गमवावा लागला. यात क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना कोरोनाने हिरावून घेतले आहे.

कोरोनाच्या या लाटीत सौराष्ट्रचे माजी वेगवान गोलंदाज आणि बीसीसीआयचे सामनाधिकारी राजेद्रंसिंह जडेजा यांचे निधन झाले आहे. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आखेर कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात त्यांना अपयश आले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सौराष्ट्र क्रिकेट संघाने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६६ वर्षे होते. एक अष्टपैलु खेळाडू म्हणून ओळख असलेले राजेंद्रसिंह जडेजा यांनी बीसीसीआयचे सामनाधिकारी म्हणूनही काम केल आहे.

राजेंद्रसिंह यांनी ५० प्रथम श्रेणी सामन्यात १३४ गडी बाद केले आहेत. तर ११ लिस्ट ए सामन्यात १४ फलंदाजांना बाद केल आहे. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांच्या नावावर १५३६ धावा आहेत तर १४ लिस्ट ए सामन्यात त्यांच्या नावावर १०४ धावा आहेत. जडेजा यांनी ५३ प्रथम श्रेणी आणि ३४ टी-२० सामन्यात बीसीसीआयचे सामनाधिकारी म्हणून काम पाहिलं. तसेच ते सौराष्ट्र क्रिकेटच्या निवड समितीचे सदस्य होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!