Share

राजीव सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे काय?

Published On: 

मुंबई : राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होते. कोरोनाची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सुरुवातीला त्याची प्रकृती चांगली होती. पण, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान, सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. पण त्यांना कोरोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता.

सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?
सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.

कोणासाठी घातक?
हा विषाणू कोरोनासारखाच आहे. रोग प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर चांगली असलेली व्यक्ती या विषाणू संसर्गावर मात करु शकते. रोग प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या विषाणूचा शरीरावर प्रभाव जाणवत नाही. पण, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते, त्यांना हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलो विषाणूची लक्षणे
सायटोमॅजिलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. संसर्ग बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल होतो. डोकेदुखी, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणे आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.

सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने आणि याची लक्षणेही कोरोनासारखीच असल्याने या विषाणूचे लवकर निदान होत नाही. त्यामुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि तरीही वरील लक्षणे जाणवत असतील तर वैद्यकीय तज्ज्ञांशी तत्काळ संपर्क साधावा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!