मुंबई : भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सेहगव नेहमीच त्याच्या गमतीशीर पोस्टमुळे चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातच नव्हे तर या खेळाडूंचे आपल्या वैयक्तिक जीवनातीही काही मजेदार किस्से आहेत. असाच एक किस्सा वीरेंद्र सेहवागने यावेळी शेअर केला आहे.
टीव्ही वरील फेमस शो ‘द कपिल शर्मा’च्या शोवर त्याने हा मजेदार किस्सा सांगितला झाले असे कि, कपिल शर्माने त्याला प्रश्न विचारला होता. 300 धावा केल्यानंतर सासरच्या लोकांनी छाती गर्वाने आणि अभिमानाने फुलत असेल ? यानंतर वीरेंद्रने हा किस्सा सांगितला यावेळी वीरेंद्र सेहवाग म्हणाला कि मी जेव्हा माझ्या सासरी गेलो तेव्हा मला भेटण्यासाठी जवळपास 10 हजारपेक्षा जास्त लोक जमले होते.
तो सगळा प्रकार पाहून मी त्या क्षणी ठरवलं की पुन्हा सासरवाडीला येणार नाही. सासरी जमलेली एवढी गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. मला तिथून बाहेर पडण्यासाठी शेवटी पोलीस बोलवायची वेळ आली. पुढे सेहवाग म्हणाला हा किस्सा मी कधीच विसरू शकत नाही, हा किस्सा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप खा.गौतम ‘गंभीर’ अडचणीत, ‘त्या’ ट्विटमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे
- ‘सातव यांच्या निधनाने मनाला अत्यंत वेदना झाल्या’, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘या’ स्टेडियमच्या वापराचा सरकारपुढं प्रस्ताव
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- करण जोहरने नाकारल्यानंतर कार्तिक आर्यनला दिली ‘या’ निर्मात्याने संधी

