Share

स्मार्ट सिटीत ओतला पाण्यासारखा पैसा, पाहा स्मार्ट औरंगाबादचा बकाल चेहरा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात आला. त्यावेळी शहरवासीयांना आता तरी मूलभूत सेवा सुविधा मिळतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र स्मार्ट सिटीत समावेश होऊन पाच वर्षे उलटून गेली तरीही आजही औरंगाबादकरांचा रस्ते, पाणी, खड्डे, कचरा या समस्यांशीच लढा सुरु आहे. मात्र स्मार्ट प्रशासन सायकल ट्रॅक, लव्ह औरंगाबाद बोर्डस, सुशोभीकरण यामध्ये मश्गुल आहे. सामान्य औरंगाबादकरांना काय हवे? याबाबत मनपा आणि स्मार्ट सिटी प्रशासनास कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मुलभूत समस्या सोडवण्यापेक्षा सायकल ट्रॅक, डिजिटल डिस्प्ले, सफारी पार्क इत्यादी बाबी प्रशासनाला महत्वाच्या वाटतात.

एेतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे हे अखेरचे वर्ष असल्याने कोट्यावधींचा खर्च करण्याची कसरत प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र या पाच वर्षांच्या कालावधीत शहराने किती प्रगती केली, नागरिकांच्या कुठल्या मूलभूत समस्या यामुळे सुटल्या हे पाहिल्यास केवळ झगमगाटावरच कोट्यवधींचा खर्च केल्याचे दिसून येते. नागरिकांसाठी जीवनावश्यक सुविधा असलेले पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज या मूलभूत समस्या आजही पूर्णतः सुटलेल्या नाहीत.

मात्र असे असतानाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली कुठे रस्ते रंगव तर कुठे भिंती, डिजीटल बोर्ड, सफारी पार्क, लव्ह औरंगाबाद, एमएसआय, रुफ टॉप सोलार, सायकल ट्रॅक, लव्ह हिस्टॉरिकल गेटस, ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन इत्यादी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. शहराला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी अंतर्गत मिळणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी योजना असली तरी शहरात पायाभूत सुविधांची वानवा आहे. या योजनेतून रस्ते, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत समस्या सोडवायला हवे होते. मात्र स्मार्ट सिटीचा खर्च सौंदर्यीकरण, सुशोभीकरण रंगरंगोटी यासारख्या गोष्टींवर खर्च करण्यात आला. त्यामुळे आजही शहरातील काही भाग बकाल अवस्थेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!