Share

चूक मान्य करण्याची नैतिकता, इच्छाशक्ती भाजपकडे नाही-अशोक चव्हाण

Published On: 

मुंबई : कोरोनाची परिस्थिती पाहता दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. त्याच बरोबर सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली, विधानसभा अध्यक्षांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप विरोधी पक्षावर करण्यात आला. त्यामुळे सभागृहात संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्याचा ठराव मांडला व तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यावरून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी कडून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पलटवार केला आहे. ते म्हणाले की ‘केलेली चूक मान्य करणे, हेच खरे प्रायश्चित आहे. पण त्यासाठी नैतिकता, इच्छाशक्ती असावी लागते. ती भाजपकडे नाही म्हणून लोकशाहीच्या नावाखाली ‘स्टंट’बाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार चुकीचा तसेच लोकशाहीच्या व विधीमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा देणारा आहे.’

सत्ताधारी महाविकास आघडीच्या वतीने भाजपवर शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजपने असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे. यावरही अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या वतीने करण्यात आलेले दावेही फेटाळण्यात आले आहे. ते म्हणाले की, ‘भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर औढवलेली परिस्थिती सांगितली तेव्हा विरोधी पक्षनेतेही सभागृहात उपस्थित होते. परंतु, त्यावेळी त्यांनी तालिकाध्यक्षांच्या विधानाच्या सत्यतेबाबत कोणताही आक्षेप नोंदवला नाही. याचाच अर्थ भास्कर जाधव बोलले ते खरे होते, असे ध्वनीत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!