🕒 1 min read
मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केलेल्या भारताचा अंडर-१९ विश्वचषक संघातील अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याच्यावर महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी वयाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संबंधी बीसीसीआयला पत्र लिहिले असून त्यात त्याने राजवर्धनविरुद्ध पुरावेही पाठवले आहेत.
अलीकडेच भारताने वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकण्यात हंगरगेकरची मोठी भूमिका होती. तेथे त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर, त्याला आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने १. ५ कोटींमध्ये खरेदी केले होते. मात्र, हंगरगेकरने त्यांच्या वयात फसवणूक केल्याबद्दल दोषी आढळल्यास हे सर्व वाया जाऊ शकते. बकोरिया यांनी बीसीसीआयला एक औपचारिक पत्र लिहिले असून त्यात हंगरगेकर यांच्या विरोधात पुराव्यांचाही समावेश आहे. पत्रानुसार राजवर्धनचे वय २१ वर्षे आहे. तो तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी होता आणि इयत्ता ८ वीत असताना त्याची जन्मतारीख १० जानेवारी २००१ पासून बदलून १० नोव्हेंबर २००२ करण्यात आली. परिणामी, तो अंडर-१९ विश्वचषक खेळण्यास पात्र ठरला.
खेळाडूंनी वय लपवण्याची पहिली वेळ नाहीये. याआधीही असे झाले आहे. यापूर्वी अशाच प्रकारची परिस्थिती बीसीसीआयने कठोरपणे हाताळली होती. रसिक सलाम दार नावाच्या काश्मीरमधील एका खेळाडूला वयाची फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयकडून २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. IPL 2019 च्या ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्स (MI) ने विकत घेतले आणि त्याने पदार्पणही केले. परंतु जून २०१९ मध्ये, बीसीसीआयला पुरावे सापडले की त्याने जन्म प्रमाणपत्रात फेरफार केला आहे आणि त्याच्यावर २ वर्षांची बंदी घातली. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये नुकतेच कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) रसिकला विकत घेतले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यावर बर्ड फ्लूचे संकट, मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
- “मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात कमकुवत…”, ‘त्या’ वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया
- औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करणार; जायकवाडी पाटबंधारे विभागाची माहिती
- पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी?
- बाबर आझम सोबतच्या वादाबद्दल वसीम अक्रमने केला खुलासा म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
