मुंबई : मोहित कंबोजला मी कधी भेटलेलो नाही. पण ऐकलेलं आहे, ते सुद्धा वर्तमानपत्र आणि इतर मिडियाच्या माध्यमातून. ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा. सोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळा आणि तुम्ही तेच कंबोज म्हणत असाल, तर त्यांच्याबद्दल मी निश्चितपणे काही ऐकलेलं आहे. ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांना मिडियाचं अटेंशन मिळतं, तसंच आपल्याला मिळावं, म्हणून ते अशा पद्धतीचे ट्विट करीत असावे, असं मला वाटतं. स्वप्रसीद्धीसाठी ते हपापले असावे, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
कुठल्या ना कुठल्या कारणाने स्वतः मिडियासमोर यावे, यासाठी कंबोजांचा हा खटाटोप असावा, असंही रोहित पवार म्हणाले. आशिष शेलारांनी कंबोजांची पाठराखण केली आहे, याबाबत विचारले असता, त्यांच्याच पक्षातील एखादा नेता त्यांची पाठराखण करण्यासाठी सरसावतो. कारण तेथे दुसरी कुठलीही संधी नसते. त्यामुळेच शेलारांनी त्यांची पाठराखण केली असावी. कुठलेही ट्विट किंवा स्टेटमेंट करून लोकांचे मत विचलित करण्याचा प्रयत्न अशा लोकांचा असतो आणि त्यातलाच हा एक भाग असावा, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Big Breaking । सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलेली क्लीन चिट 2 वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित
- Monsoon Session | ’50 खोके एकदम ओके’.. तुम्हाला पाहिजे का?; शिंदे गटाची विरोधकांना ऑफर
- Assembly Session 2022 | राज्य सरकार दिल्लीश्वरांचे वारकरी झाले आहेत – मनीषा कायंदे
- Pratap Sarnaik | यावर्षी सरकारकडून गोविंदांना १० लाखाचं सुरक्षा कवच जाहीर – प्रताप सरनाईक
- Sanjay gaikwad | “लफडी करणाऱ्यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही”; संजय गायकवाडांचा मुंडेंवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

