Share

राऊतांचा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेला- प्रविण दरेकर

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी शिवसेनेचे मंत्री,आमदार, खासदार शिवसेना भवनात उपस्थित आहेत. यावेळी राऊतांनी अनेक मुद्द्यांचा खुलासा केला.तर काही मुद्दे पुढच्यावेळी सांगणार असे ते म्हणाले. तसेच साडेतीन नेते कोण यासंदर्भात खुलासा ते पुढच्या वेळेस करणार आहे. दरम्यान, राऊतांच्या परिषदेनंतर आता भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून राऊतांचा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेला, असे ते म्हणाले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘यांना सत्यतेमध्ये जायचे नाही. यांना केवळ ढोल पिटायचेत. पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप गेल्याचे चिन्ह दिसलं. शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी, तसेच इतर नेत्यांनी याकडे पाठ फिरवली’, असे दरेकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुंबई शिवसेनेचा बेस असून देखील नाशिकवाले इकडे आले आणि त्यांनी हा इव्हेंट केला. परंतु ते तोंडावर पडले. कारण शिवसैनिकांना असे आक्रस्थाळपणाने वागणं,आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोर भरकटत जाणं. अजिबात आवडलेलं नाही’, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!