Share

“धर्माचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर संघर्ष पेटण्याची शक्यता होती. मात्र काल राज्यातील अनेक भागांत सलोख्याचे दर्शन घडले. अनेक मशीदीवर भोंग्याविना नमाज पठन करण्यात आली. तर कुठे आवाजाची मर्यादा पाळत नियमांचे पालन करण्यात आले. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत राज्यातील जनतेचे कौतुक केले आहे.

कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास आहे. असे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच “धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे.”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!