Share

मोहित भारतीय यांच्याकडून नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Published On: 

मुंबई : क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपांचा समावेश आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा याला सोडून देण्यात आल्याचा दावा केला होता. त्या आरोपावरुन आता मोहित भारतीय यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबईच्या माझगाव न्यायालयात हा दावा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं.

नवाब मलिक मंत्रिपदाचा गैरवापर हा वैयक्तिक रागाचा वचपा काढण्यासाठी करत आहेत. मलिक मंत्रिपदाचा पुरेपूर गैरफायदा घेत आहेत. अशा माणसाला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून एक दिवसही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असंही मोहित भारतीय म्हणाले आहेत.

माझ्या कुटुंबियांविषयी आणि माझ्याविषयी खोटे आरोप ते करत आहेत. त्याविरोधात आम्ही नोटीस पाठवल्या होत्या. त्याला उत्तर दिलं नाही. त्यामुळे आम्ही क्रिमिनल डिफरमिशन दाखल केलं असल्याचं मोहित भारतीय म्हणाले. तसंच येणाऱ्या काळात सिव्हिल डिफरमिशन दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवाब मलिक हे पदाचा आणि सरकारी यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही भारतीय यांनी केला आहे.

दरम्यान,अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केला होता. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!