मुंबई : टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान एकत्र खेळत आहेत. नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियातून बाहेर झालेला पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. पुजारा आणि रिझवान या दोघांनी आज ससेक्स संघाकडून पदार्पण केले. दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.
आजपासून काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-२ मध्ये ससेक्स आणि डर्बीशायर यांच्यात सामना खेळवला जात आहे. ससेक्सच्या ट्विटर हँडलवर पुजारा आणि रिझवानचा फोटो शेअर करत हे दोघेही आजच्या सामन्यात पदार्पण करत असल्याचे लिहिले आहे. भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. सर्व क्रिकेट चाहत्यांना रिझवान आणि पुजाराला एकत्र फलंदाजी करताना पाहायचे आहे. पुजारा चौथ्या क्रमांकावर तर रिझवान पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.
डर्बीशायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सतत खराब कामगिरीमुळे पुजारा आणि अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. रहाणे सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : CSK पाठोपाठ टीम इंडियालाही धक्का..! आता काय करणार रोहित शर्मा?
- आंबेडकर जयंतीला डॉल्बी लावण्यावर बंदी, नागरिकांचा रास्ता रोको
- IPL 2022 : हिटमॅन बनला दहा हजारी मनसबदार..! फॉर्मात नसलेल्या रोहितची टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी
- IPL 2022 : जे कोणालाही जमलं नाही ते ‘गब्बर’नं करून दाखवलं; मुंबईविरुद्ध धवननं रचला वर्ल्ड रेकॉर्ड!
- IPL 2022 : “मला वाटलं की…”, मुंबई इंडियन्सच्या सलग पाचव्या पराभवानंतर रोहित काय म्हणाला बघा!
- IPL 2022 : रोहित शर्माला २४ लाखांचा दंड; मुंबई इंडियन्सवर ‘मोठी’ कारवाई!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


