Share

अफगाणचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतरही तालिबान्यांविरोधात लढली ही महिला; आता तालिबान्यांनी…

Published On: 

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील महिलांसह जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. महिलांवर विविध निर्बंध घालण्यास येत आहेत. शरियतच्या कायद्यानुसार अफगाणिस्तान चालवण्यात येणार असल्याचे तालिबानने जाहीर केले आहे. दरम्यान, राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तानातून पळ काढल्यानंतर देशात अराजकता माजून संपूर्ण देश हा तालिबान्यांच्या हातात गेला आहे.

अशा प्रतिकूल स्थितीतही तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजत आहे. सध्या त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नसून सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत ज्यांनी गेल्या काही काळापासून तालिबान्यांच्या विरोधात लढा दिला. तालिबान्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सलीमा माझरी यांनी स्वतःची सेना तयार केली होती. तालिबान्यांनी बल्ख प्रांतामधून सलीमा यांना ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!