Share

आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान

Published On: 

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशातील लहान बालकांसाठीही दोन लस तयार करण्यात येत असून त्यावर काम सुरू असल्याची महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबतची मोठी घोषणा केली. यावेळी मोदींनी लहान मुलांच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. लहान मुलांनाही लस मिळाली पाहिजे. त्यासाठी दोन लसींवर काम सुरू आहे. त्यात लवकरच यश मिळेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. देशात 7 कंपन्या लसनिर्मिती करत आहेत. 3 आणखी लसींची ट्रायल सुरु आहे. लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी अन्य कंपन्यांशी संपर्क सुरू आहे, असंही ते म्हणाले.

‘लहान मुलांना अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरणात काही नवी लशी आणल्या गेल्या. गरिबांच्या चिंतेपोटी हे केलं. लसीकरणाचं लक्ष्य 100 टक्के होत असतानाच कोरोनाने आपल्याला घेरलं. आता भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वाचवू शकेल का याचीच चर्चा जगात होती. पण नीती साफ असेल, नियंत्रण असे तर त्याचे परिणाम दिसतात,’ असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!