गुजरात : अयोध्येच्या तीर्थयात्रेसंदर्भात गुजरात सरकारकडून महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली असून अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थ यात्रेला जाणाऱ्या गुजरातमधील आदिवासींना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. अशा पद्धतीने एकूण ५० हजारांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे पर्यटन मंत्री पूर्णेश मोदी यांनी दिली असून ‘आदिवासी लोक शबरी मातेचे वंशज आहेत. भगवान राम यांची १४ वर्षांच्या वनवासावेळी शबरी मातेशी भेट झाली होती. आता त्यांच्या वंशजांना अयोध्येच्या तीर्थ यात्रेसाठी आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे’, असे मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, गुजरातमधील आदिवासी बहुल डांग जिल्ह्यात आज पुर्णेश मोदी यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी सुबीर गावातील शबरी धाम येथे उपस्थितांना ते संबोधित करत असतांना ते म्हणाले की,’आदिवासींच्या अयोध्या तीर्थ यात्रेसाठी सरकार ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करत आहे.’ तसेच ही मदत कैलाश मानसरोवर यात्रा, सिंधु दर्शन आणि श्रवण तीर्थ यात्रेसाठी केल्या जाणाऱ्या मदती इतकीच आहे’, असेही त्यांनी नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
