नवी-दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची किंमत फक्त ४५,००,००० रुपये आहे का?’ असा सवालही ओवैसी यांनी केला आहे.
‘आज तक’ सोबत संवाद साधतांना ओवैसी म्हणाले की, ‘या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची किंमत फक्त ४५,००,००० रुपये आहे का?’उत्तर प्रदेश सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करत हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. याविषयो बोलतांना ओवैसींनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर हा हिंसाचार झाला आहे आणि त्यानंतर खूप वेळानंतर मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर पोलीस त्याला बोलवतात. तपासाच्या ११ तासांमध्ये १० वेळा नाष्टा दिला जातो. खूनाच्या आरोपीला तुम्ही १० वेळा खायला घालता? तो पोलिसांकडे नाही तर सासूरवाडीला गेला होता असे वाटत होते. मंत्र्यांनी सुद्धा कबुल केले आहे की ती आमची गाडी होती. भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ मिश्रा यांचा संबंध एका उच्च जातीसोबत असल्याने त्यांना वाचवत आहे. भाजपा पूर्णपणे त्यांना वाचवत आहे.’ तसेच ‘पंतप्रधानांनी अनेक आरोपांनंतर अजय कुमार मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. जर आरोपी मंत्र्याचा मुलगा असेल तर न्याय कसा मिळेल’ असा सवालही यावेळी ओवैसींनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा
- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा!’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

