Share

सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही” 

Published On: 

नवी दिल्ली- सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त असून या गटातील व्यक्ती सातत्याने आंदोलनस्थळी वावरत असल्याने शेतकरी संघटनांवरही दबाब वाढू लागला आहे.

या प्रकरणातील हत्येचा मुख्य आरोपी निहंग शीख सरबजीतने आत्मसमर्पण केले. आज आरोपी निहंग सर्वजीतला कोर्टाने 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. मृत तरुणाचे हात कापून त्याला पोलिसांच्या बॅरिकेड्सवर लटकवले होते. या घटनेमुळे सिंघू सीमेवर तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान सरवजीत सिंग याने हत्या केल्याबद्दल आपल्याला कोणतीही खंत नसल्याचं म्हटलं आहे.पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याआधीचा सरवजीतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो इतर निहंगा त्याच्या अवतीभोवती दिसत आहेत. यामधील किमान दोघांच्या हातात तलवारी होत्या. यावेळी एका पत्रकाराने सरवजीतला तुम्हाला पश्चाताप होतोय का? अशी विचारणा केली. यावर सरवजीत सिंग उत्तर देण्यास उत्सुक नव्हता. मात्र त्याने आपलं डोकं हलवत नाही असं उत्तर दिलं.

दरम्यान, या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी आता शशांक शेखर झा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी सांयकाळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. या याचिकेत त्यांनी सिंघू बॉर्डर लवकरात लवकर रिकामी करण्यात यावी, मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!