Share

मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांना शहरी विकास विषयक केंद्र सरकारच्या स्थायी समितीत २०२१–२२ वर्षासाठी पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. शहरी बाबींशी संबंधित निर्णय घेण्याचा समितीला महत्त्वपूर्ण अधिकार आहे. या समितीवर विविध पक्षातील ज्येष्ठ सदस्यांचा समावेश करण्यात येतो.

लोकसभा सचिवालय दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करुन एक वर्षाच्या कालावधीसाठी सरकारी समित्यांची स्थापना करते. खासदार इम्तियाज जलील गेल्या वर्षी सुध्दा शहरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते त्यांना पुन्हा त्या समितीमध्ये नामांकित करण्यात आले असुन ज्यात एम.जे. अकबर, दिग्विजय सिंह, गौतम गंभीर, हेमा मालिनी, संजय सिंह, बेनी बेहनन यांच्यासह इतर संसदेचे वरिष्ठ सदस्य देखील आहेत.

सदरील समिती केंद्र सरकार पुरस्कृत सर्व प्रकल्प जसे स्मार्ट सिटी, अमृत योजना, मेट्रो रेल, सीपीडब्ल्यूडी, बँकिग इत्यादी विषयी हाताळते. खासदार जलील हे केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण समितीचे सुध्दा सदस्य असून त्यांची अलीकडेच जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्लीचे बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!