Share

‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’

Published On: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता नवा इशारा दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. अजित पवारंना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. आशा करतो की त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असावी, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.

बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, अशी टीकाही त्यांनी केली.

पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून रेड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावच लागेल. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावंच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असं मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करून दाखवलं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!