Share

महाराष्ट्राचं हवामान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नव्हतं; म्हणून ते आले नाहीत : चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले.

दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.

या नंतर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत कि फक्त गुजरातचे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात देखील चक्रीवादळामुळे नुकसान झालंय. असं असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची पाहणी का केली नाही ? तसेच मदत देखील का घोषित केली नाही ? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.

आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर टीका करताना मोदींनी महाराष्ट्राचा दौरा का केला नाही ? याचं देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ‘पंतप्रधानांच्या पाहणीवेळी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे पंतप्रधानांना हवाई पाहणी करण्याचा गुप्तचर यंत्रणांचा सल्ला होता. महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत,’ असं पाटील म्हणाले.

यसोबतच, ‘वादळात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयांची सरसकट मदत मोदीजींनी गुजरातमधून घोषित केली आहे. ही मदत केवळ गुजरातला केली हा प्रचार चुकीचा आहे,’ असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!