Share

उदयन महाराज भोसले आणि अजित पवार यांची पुणे शहरात गुप्त बैठक..

Published On: 

पुणे: महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर असणारे खासदार उदयन महाराज भोसले यांची आज पुणे शहरात गुप्त बैठक झाल्यामुळे पुण्याच्या आणि एकूणच महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय पंडितांकडून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. उदयन महाराज भोसले राष्ट्रवादी पक्षात असताना सुद्धा त्यांचे आणि अजित पवार यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते होते.

उदयन महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेल्यावर या दोघांच्यामधील वाद जरा कमी होताना दिसले, त्यातच पुण्यात आज अजित पवार आणि उदयन महाराज भोसले यांच्यात गुप्त बैठक झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यामध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु असल्याचं कळतंय.

उदयनराजे भोसले यांनी कालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती,त्यामुळे आजची अजित पवार यांच्याबरोबर सुरु असलेलया  बैठकीचा विषय काय असेल याची उत्सुकता राज्यातील राजकीय पंडितांना लागून राहिली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमक्या विषयांवर चर्चा सुरु आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

मात्र, या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाल्याचं कळतंय. दरम्यान, या बद्दल छत्रपती उदयन महाराज भोसले यांना विचारले असता ही बैठक अपूर्ण राहिलेली काम पूर्ण करण्यासाठी होती असं त्यांनी सांगितलं. मी कालच नितीन गडकरी यांची भेट घेतली होती आणि आज अजित पवार यांची भेट घेतली आहे यात काही इतर अर्थ काढायची गरज नाहीये.

           महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!