Share

“यातुन निर्माण होतील ५० लाख रोजगार…” नितीन गडकरींचा दावा

Published On: 

🕒 1 min read

पुणे: केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आज (शुक्रवार ५ फेब्रुवारी) पुण्यात होते. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ९४ व्या वर्धापन दिनी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले,’भारताला कच्च्या तेलाच्या आयतीसाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून आपण खुप बचत करू शकतो. फक्त पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल वापरला तरी ९०० करोड लिटर इथेनॉल आपल्याला लागेल. या इथेनॉल उत्पन्नासाठी लागणाऱ्या कामामधून भारतात ५० लाख रोजगारांची निर्मिती होऊ शकते.’

याशिवाय त्यांनी इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याची भूमिका केंद्राने घेतली नसती महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद पडले असते, असाही दावा त्यांनी केला आहे. सध्या भारतात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रित केले जाते. पुढे २०२५ मध्ये ते प्रमाण २० टक्क्यावर नेण्याचं ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. भारतातील गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना फ्लेक्स इंजिन (पेट्रोल सह इथेनॉलवर चालणारे) बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पुण्यात ३ इथेनॉल पंपांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

या प्रकारच्या इथेनॉल निर्मितीसाठी मका, तांदूळ, साखर, बांबू यासारखे वेगवेगळ्या शेती उत्पादकांचा वापरा होतो. त्यातून ग्रामीण इकॉनॉमी बदलेल अशी अशा त्यांनी गडकरींनी व्यक्त केली आहे. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेवरचा भार कमी होईल, असे ही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!