🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : झारखंड हे लिंचिंग आणि हिंसाचाराची फॅक्टरी झाली असून दलित आणि मुस्लिमांची दर आठवड्याला हत्या होत आहे. त्यामुळे मोदीजी तुमचा हा नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते.
GN Azad, Leader of Opposition in Rajya Sabha: Jharkhand has become a factory of lynching & violence. Dalits & Muslims are killed there every week. PM, we are with you in the fight of 'Sabka saath sabka vikas' but it should be there for people to see it. We can't see it anywhere. pic.twitter.com/nNXmwirnuB
— ANI (@ANI) June 24, 2019
यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराची फॅक्टरी झाली आहे. दलित आणि मुस्लिमांची दर आठवड्याला हत्या होत आहे. प्रधानमंत्रीजी आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’च्या लढाईत तुमच्यासोबत आहोत. पण हे लोकांना दिसलं पाहिजे. आम्ही ते पाहू शकत नाही आहोत.
GN Azad: In Old India there was no hatred, anger or lynching. New India is one where humans are enemies of each other. You won't be scared of animals in a jungle but you'll be scared of humans in a colony. Give us India where Hindus, Muslims,Sikhs&Christians live for each other. https://t.co/IqoICDjBxh
— ANI (@ANI) June 24, 2019
तसेच मी तुम्हाला विनंती करतो की, नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला आमचा जुना भारत परत करा. जिथे प्रेम, संस्कृती होती. जर मुस्लिम आणि दलितांना काही ठेस लागली तर हिंदूंनाही यातना व्हायच्या. जेव्हा एखादी गोष्ट हिंदूंच्या डोळ्यात जायची तेव्हा मुस्लिम आणि दलित त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे, असे गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
