🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातल्या विविध भागात काल शेतकरी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अडीच वर्षात 10 कोटी शेतकऱ्यांना 95 हजार कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये आयोजित एका संमेलनात दिली.
युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी असलेली 21 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद वाढवून मोदी यांनी ती एक लाख 34 हजार 399 कोटी रुपये केल्याचं शाह यांनी सांगितलं.शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध एकही गोष्ट मोदी करणार नाहीत याबद्दलची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
चर्चेद्वारेच प्रश्न सुटू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातही भाजपाच्या वतीनं ठिकठिकाणी सुशासन दिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.नव्या कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना अधिक लाभ आणि अधिकार मिळत असून, शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहा राज्यातल्या शेतकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- वयाच्या २१ व्या वर्षी ‘ती’ झाली देशातील सर्वात तरुण महापौर !
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- ‘सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करू’
- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
