जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राजकीय घडामोडीवरून चांगलाच टोला लगावला. भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव यशस्वी होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपसह राज ठाकरेंवर देखील चांगलाच निशाणा साधला आहे.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप सरकारवर केला होता. याला एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवास्थानी पत्रकारांशी बोलत असताना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच “प्रत्यक्षात भाजप स्वत:च राज्यात अशांतता पसरविण्याचे काम करत असून भोंगा, हनुमान चालीसा या मुद्यावरुन बोंबा मारुन महागाईवरुन लोकांचे लक्ष विचलीत करत आहे”, असेही खडसे म्हणाले.
यासह “सत्ता नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे नेते आदळआपट करत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेले नाही, अशा बोंबा मारत आहेत. भोंग्याकडे लक्ष वळवित आहेत. महागाईवरुन सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. वारंवार अशांतता पसरविण्याचे काम भाजप करतेय. राज्यापालांना भेटताहेत. या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव भाजपचा असून तो यशस्वी होणार नाही”, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.
हनुमान चालीसा औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरुन पुन्हा वाद पेटला आहे. तर संभाजीनगर नाव व्हावे, यासाठी मनसे आक्रमक आहे. या विषयावर बोलताना खडसे म्हणाले, समाजामध्ये, शहरा-शहरांमध्ये अशांतता पसरविण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी नाव न घेता खडसेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –

