Share

अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का?; मुरलीधर मोहोळ यांचा संजय राऊतांवर निशाणा

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २७ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या, तसेच मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. यावरच भाजपचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

“खा. राऊतांना आपण खरंच सर्वज्ञानी आहोत, हे वाटायला लागलंय की काय? अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम आणि ठोकली काहीही ‘धूम’”, असे ट्वीट करत मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही द्वेषपूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. ते देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही, तिथेही संवेदशनशील असायला हवं. पण दुर्दैवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!