मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून आता ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयावर आता विरोधकांनी भाष्य केले आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हणाले कि, ‘ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आर्थिक जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असे केंद्र सरकारने म्हटल्याबरोबर महाराष्ट्रातली तिसरी लाट येण्यापूर्वीच ओसरली असावी. असो, शाळांबाबत हे उशीरा सुचलेले शहाणपण असले तरी त्याचे स्वागत.’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आर्थिक जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असे केंद्र सरकारने म्हटल्याबरोबर महाराष्ट्रातली तिसरी लाट येण्यापूर्वीच ओसरली असावी.
असो, शाळांबाबत हे उशीरा सुचलेले शहाणपण असले तरी त्याचे स्वागत. pic.twitter.com/UzxgTr4dUJ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- २८ सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास साष्टपिंपळगाव आंदोलक घेणार जलसमाधी!
- पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निर्बंधांमध्ये अधिक शिथिलता ? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
- सोयाबीनची किंमत मातीमोल, याला मोदीच जबादार; नाना पटोलेंचे टीकास्त्र
- ‘…तर राजकारणात अपमानाला स्थान आहे का?’ अमरिंदर सिंगचा थेट काँग्रेस हायकमांडला सवाल
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

