औरंगाबाद : साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात आले होते. संपूर्ण ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले होते. मुख्यमंत्र्यांनाही या आंदोलकांची अखेर भेट घ्यावी लागली होती. आंदोलकांनी केलेल्या मागण्या लवकरच मान्य केल्या जातील असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले होते. मात्र अजूनपर्यंत यातील कुठल्याही मागण्या मान्य झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर येत्या २८ तारखेपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास, २९ सप्टेंबरला शहागड येथील उड्डाणपुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानुसार मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होते. मराठा तरुणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत असल्याने आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील शिष्टमंडळाने भेट घेतली होती यावेळी ठाकरे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली मात्र या भेटीला ही महिने उलटून गेल्यानंतरही मराठा आरक्षणाचा विषय मागे पडला आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या मागणीसाठी दोन कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळालेला नाही.
सरकारला अजून काही मराठा समाजाचे बळी हवे आहेत का ? जर बळी हवाच असेल तर आणि नंतर हा प्रश्न आपले म सरकार मार्गी लावणार असेल तर, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सरकारला माझा बळी देण्यास तयार आहे. त्यामुळे येत्या २८ तारखेपर्यंत मराठा आरक्षणा संबंधी केलेल्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास शहागड येथील उड्डाणपुलावरून गोदावरी नदी पात्रात आपण जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आंदोलनाचे मुख्य संयोजक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रस्त्यांची दुरुस्ती व समस्यांबाबत सुप्रिया सुळेंचे गडकरींना निवेदन
- पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निर्बंधांमध्ये अधिक शिथिलता ? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
- सोयाबीनची किंमत मातीमोल, याला मोदीच जबादार; नाना पटोलेंचे टीकास्त्र
- ‘…तर राजकारणात अपमानाला स्थान आहे का?’ अमरिंदर सिंगचा थेट काँग्रेस हायकमांडला सवाल
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर


