Share

‘मोदी हे आमचे आई बाप; तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं चालेल का ?’

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव हा २०१४ पेक्षा २०१९ मध्ये अधिक वाढलेला पाहायला मिळाला. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता स्थापन करून मजबूत स्थिती निर्माण केली. मात्र, महागाई, नवे कृषी कायदे, चीनची घुसखोरी, कोरोना आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी आता मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप विरोधी पक्षांचे राज्यातील नेते देखील पंतप्रधान मोदींवर विखारी टीका करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांचा समाचार घेतला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं आणि मग त्यांच्यावरच उठता बसता टीका करायची असा उद्योग सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पाठीत खंजीर खुपसणारे कोण असं म्हटल्यावर आता दोन चेहरे डोळ्यासमोर येतात !

‘पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!