Share

Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ईडीमुळं आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना हो हे ईडीचं सरकार आहे, असं म्हटलं होतं. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल, असा टोला लगावला आहे. ५० खोके आणि महागाई एकदम ओके असं म्हणत महेश तपासे यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर हल्लाबोल केला.

तपासे म्हणाले कि, ५० खोके आणि महागाई एकदम ओके असं अनोखं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर गुरुवार १ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाचे ठिकाणी प्रमुख शहरामध्ये तालुका स्तरावर हे आंदोलन आम्ही घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची जी धारणा जेव्हा पासून मोदी सरकार विराजमान झाले आहे. तेव्हा पासून देशाची महागाई आणि देशाअंर्गत असलेली उच्चांक गाठला आहे. परंतु या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारला वेळ नाही, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षच सरकार आहे. तिथे आमदार बंड निर्माण करणे,संविधानीकपेचप्रसंग निर्माण करणे. तिकडचं सरकार कोसळून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणणं. मोदी सरकारला महागाई, बेरोजगारी असल्या विषयात रस नाही. ५० खोके आणि महागाई एकदम ओके, असं शेवटी ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!