Share

मोदींचा हिंदू नर्सेस वर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सकडून लस घेतली : प्रकाश आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात पण हिंदू परिचारिकांवर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून त्यांनी ख्रिश्चन परिचारकांकडून लस टोचून घेतली. अशा आशयाचे ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1366328328504811526?s=20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. आणखी २८ दिवसांनंतर ते लसचा दुसरा डोस घेतली. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

परिचारिका पी निवेदा या ख्रिश्चन असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. मोदींचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी लस घेण्यासाठी पी निवेदा या ख्रिश्चन परिचारिकेची निवड केली असे मत प्रकाश आंबेडकर यांचे आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटवर अजूनतरी भाजपच्या कोणत्याही नेत्याने उत्तर दिलेले नाहीये. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेवर भाजप नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!