Share

शरद पवारांपाठोपाठ लेक सुप्रिया सुळेंनी देखील घेतली कोरोना लस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. आणखी २८ दिवसांनंतर ते लसचा दुसरा डोस घेतली. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोना लसीकरणासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल होऊन कोरोना लसीकरण त्यांनी केलेले आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील रुग्णालयात आल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांनी देखील पवारांपाठोपाठ कोरोनाची लस घेतलेली आहे. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी कोरोनाची लस घेतली असल्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून दिलेली आहे.

‘जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली. सरकारने आजपासून (१ मार्च) तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात केली आहे.आपणही नोंदणी करुन लस अवश्य टोचून घ्यावी ही विनंती.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!